परिचय
नांव चंद्रदीप शशिकांत नरके
जन्मतारीख २०.१०.१९६७
जन्मठिकाण कोल्हापूर
धर्म हिंदू
जात मराठा
पत्ता कृषीचंद्र,
११८७-ए, शिवाजी पेठ, कोल्हापूर -४१६ ००१
फोन नं. (०२३१) २६२३९७३, २६५८२७३.
फोन नं. ०२३१-२६२३९७३ निवास(निवास), २६५८२७३(ऑफीस)
इ-मेल chandradeepnarake@rediffmail.com
वेबसाईट www.chandradeepnarake.com
शिक्षण B.E. Civil
ज्ञात भाषा मराठी,हिंदी,इंग्रजी
व्यवसाय शेती
विवाहित/अविवाहित विवाहित
पत्नीचे नांव राजलक्ष्मी चंद्रदीप नरके

अपत्य

एकूण ३(अ) मुलगा -१ ,(ब) मुली - २
मतदार संघ (अ) क्रमांक - २७५, (ब) जिल्हा - कोल्हापूर
राजकीय पक्ष शिवसेना
सदस्यांनी केलेल्या कामाचा तपशील
पदाधिकारी अध्यक्ष,
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे.
संस्थाप्रमुख,
कुंभी कासारी सहकारी बॅंक लि., कुडित्रे.
संस्थाप्रमुख,
कुंभी कासारी शिक्षण समूह, कुडित्रे.
उपाध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा अॅॅमॅॅ च्युअर स्विमिंग असोसियशन
उपाध्यक्ष,
कोल्हापूर चेंबर ऑफ़ कॉमर्स
सदस्य,
प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्स असोसियशन
सामाजिक व राजकीय कार्य

सन १९८८-८९ पासून विद्यार्थीदशेत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी वाढ, शहर बस पास भाडे वाढ, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एनएसयूआय च्या माध्यमातून सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. युंवक कॉंग्रेसच्या माध्यमातून गावागावात विद्यार्थी संघटना स्थापना करून युवकांना संघटीत केले. शिवाजी स्टुडंट स् कोन्सीलच्या माध्यमातून महाविद्यालायीने विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम

१९९४-९५ मध्ये आपले आजोबा आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय दि.सी.नरके यांच्या मार्गदर्शना खाली कुंभी -कासारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली. १९९७-९८ व १९९८-९९ मध्ये चेअरमन पदी निवड .

कारखान्याचा चेरमन म्हणून काम करताना उस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न. त्याच बरोबर कुंभी- कासारी सहकारी बँकेच्या चेअरमन पदावर १९९८ ते २००५ पर्यंत काम करताना शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा, तरुंणाना व व्यावसायिकांना उद्योग धंद्यासाठी कर्ज पुरवठा उच्च शिक्षणासाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला आहे.

महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षार्थी उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याचे यासास्वी आंदोलन.

कै.डी.सी.नरके स्मृती व्याख्यानमालेद्वारे थोर विचार वंतांकडून समाज प्रबोधन.

पूरग्रस्तांना मदत साहित्याचे वेळोवेळी वाटप.

रक्तदान शिबिरे व आरोग्य विषयक शिबिरे यांचे आयोजन.

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा व कुस्ती स्पर्धांचे आयोजन व परिसरातील खेळाडूंना वार्षिक मानधन.

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी म्हणून आंदोलन.

कुंभी कासारी साखर कारखान्यात उत्कृष्ठ व्यवस्थापन व उच्च दर देण्यास अग्रेसर

ग्रामीण भागातील शेती पंपासाठी चे विद्युत भारनियमन कमी करण्यासाठी यसस्वी आंदोलन .

शेती वीज पंपाच्या विद्युत वापरावरील अन्यायी दरवाढ कमी करण्यासाठी यसस्वी आंदोलन .

शेती मालाला हमी भाव मिळण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा.

सहकारी संस्था

कुंभी-कासारी बँकेच्या माध्यमातून शेती, उद्योग व युवकांना स्वयंरोजगारासाठी सुलभ अर्थ साहाय्य.

करवीर मतदार संघातील गावांमध्ये दूध सहकारी संस्था, सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था यांच्या माध्यमातून घरोघरी वयक्तिक संपर्क.

शिक्षण व क्रिडा क्षेत्र

कुंभी-कासारी शिक्षण समूहांतर्गत शाळा व २ कॉलेजस उभारणी.

परिसरातील अंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडविण्यासाठी अत्याधुनिक व्यायाम शाळा, तज्ञांकडून प्रशिक्षण व निवास व्यवस्था असणाऱ्या कुस्ती संकुलाची उभारणी.